आठवण चवीची...
तू बनवलेल्या फोडणीच्या भाताची....
ब्रेडच्या भाजीची आणी आम्बट-गोड केकची.
मधल्या सुट्टीतील डब्यातल्या गम्तींची...
आठवण स्वरांची,
स्वयंपाक करत असताना म्हटलेल्या गाण्यांची,
वेणी घालत असताना शिकवलेल्या श्लोकान्ची...
बेला के फूलची आणी पेटीच्या प्रक्टिस ची..
आठवण वासान्ची,
तव्यावारील गरम पोळ्यांची, कढवलेल्या तुपाची
देव्हार्यातील उत्बत्तीची, उतू जात जात....
शांत झालेल्या उकळत्या दुधाची.
आठवण उन्हाची,
चहाच्या सोबतीला असलेल्या किरणांची.
फ़ोन काढून ठेवलेल्या, ताणलेल्या झोपेची.
घरातल्या भिन्तिन्ना ऊब देणार्या प्रकाशाची.
आठवण पाण्याची,
गच्चीत्ल्या फुलांची आणी पार्व्यांच्या आंघोळीची
डोळ्यात डबडबणार्या अश्रूंची
पलंगाजवळील तांब्या-भांड्याची....
आठवण...
...डोळ्यासमोर नसलेल्या...
पण तरीही असलेल्या
जादूच्या गोष्टींची.
...डोळ्यासमोर नसलेल्या...
पण तरीही असलेल्या
जादूच्या गोष्टींची.
0 comments:
Post a Comment